Mr Arun Sawant - Views on this years 2017 safety news 11.07.2017

19.01.2020
Arun Sawant (61) fell to his death at Konkan Kada 19th jan 2020
https://timesofindia.indiatimes.com/city/thane/thane-rappeller-who-discovered-new-trek-route-falls-to-death-from-murbad-fort/articleshow/73404960.cms

---------------------------------------------------------------------------
11.07.2017

आजकाल गिर्यारोहण करणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे ..... ही चांगलीही बाब आहे अन वाईटही .....!

किती ग्रुप्सनी एखाद्या ठिकाणी जावे अन एका ग्रुपमध्ये किती शिबिरार्थी न्यावेत याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही .... आपला ग्रुप कसा लवकर पुढे नेता येईल यात स्पर्धा निर्माण होते .... त्यामुळे जिथे bottle neck points असतात तिथे अपघात होण्याची शक्यता वाढते ..... आजकाल होणाऱ्या अपघातामुळे ही बाब अधोरेखितही होते ....!

परवा पेब फोर्ट वर जो अपघात झाला त्यात एका अरुंद उतारावर एक मुलगी घसरली अन तिला वाचवायला गेलेला तरुणही घसरला .... अन रेस्क्यू टीमला बोलवावे लागले .... रेस्क्यू करणाऱ्यांनाही किती त्रास देणार तुम्ही ..... !

पण थोडीशी काळजी घेतली असती तर या घटनेतील पुढील भाग नक्कीच टाळता आला असता ....!

तुम्ही ग्रुप घेऊन जाता तर स्वतः बरोबर दोर का नाही घेऊन जात ?

आपल्या इथे गिर्यारोहणासाठीचे दोर सहज उपलब्ध आहेत.

कितीही सोप्पे गिर्यारोहण असले तरी १०० फुटांचा एक तरी दोर घेऊन जा .... पावसाळ्यात पेब फोर्ट सारख्या ठिकाणे १०० फुटांचे दोन दोर न्या की .... दोर कॅरी करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ....!

परवा त्या ग्रुप कडे दोर असता तर त्या मुलीला वर घेता आले असते की ... अन जो दुसरा मुलगा घसरला तो घसरला नसता की .... दोर असला की काहीतरी मार्ग काढता येतो .....!

पाच सहा वर्षांपूर्वी मी पावसाळ्यातच पेब फोर्टला गेलो होतो .... भरपूर गर्दी होती .... त्यात एक चार जणांचा असाच कुठल्यातरी गावातला खाजगी ग्रुप पिकनिकला म्हणून आला होता ..... आजकाल पिकनिक म्हणूनही बरेचजण अशा ठिकाणी येत असतात .... अन त्यातील एकजण दरीत साठ सत्तर फूट घसरला ..... अंगाला खरचटले होते ..... घाबरून रडत होता .... हा प्रसंग घडल्यानंतर साधारण वीसेक मिनिटात मी तिथे पोहोचलो असेन .... कसली बोंबाबोंब चाललीय म्हणून जमलेल्या मुलांना विचारले तर त्यांनी खाली दरीत पडलेल्या मुलाकडे बोट दाखविले ..... म्हटले सर्वांनी आता मागे व्हा अन त्याला तुमचे बहुमूल्य advise द्यायचे थांबवा. नाहीतर त्याला आणखीन खड्ड्यात घालाल ....!

मी माझ्या सॅक मधला १०० फुटांचा दोर काढला अन पुढे जे काय करायचे ते केले ....!

जो पडला होता त्याच्या कमरेला दोर बांधताना माझ्या लक्षात आले की भाऊ भरपूर प्यालेला आहे ..... आता काय बोलावे कळेना .... मी त्याच्या कमरेला बांधलेला दोर परत सोडला व दोराला धरून दूर जाऊ लागलो तेव्हा तो "अहो मला सोडून कुठे चाललात" म्हणत परत ओरडायला लागला .... म्हटले तू दारू पिऊन आला आहेस म्हणून मी तुला नाही वाचवणार .... जाम घाबरला ..... म्हटले दारू प्यायची ती घरीच काय ती पी .... इथे कशाला आलास दारू पिऊन .... मेला असतास की .... आईवडिलांची शपथ घेऊन सांग की मी यापुढे दारू पिणार नाही ...!

भाऊने शपथ तर घेतली खरी, पण चेहऱ्याकडे बघितल्यावर किती दिवस शपथ टिकेल शंकाच होती ....!

सांगायचे तात्पर्य, गरज नसतानाही दोर कॅरी करायची सवय लावा .... तुमच्या नाही पण दुसऱ्या ग्रुपमधील कोणाला तरी त्याचा उपयोग होईल अन आहे तिथे विषय संपेल अन गिर्यारोहणाची होणारी बदनामी थांबेल ....!

तुमच्याकडे दोर नसेल तर मी देतो तुम्हाला असेच .... ट्रेक झाल्यावर मात्र आठवणीने परत आणून द्या ..... मला ९८६९४७४३४३ वर किंवा Suraj Malusare ९२२१८३१३६४ वर संपर्क साधा .... पण यापुढे साध्या ट्रेकलाही मजा म्हणून दोर कॅरी करायची सवय लावा भाऊ .....!
original link
https://www.facebook.com/arunpsawant/posts/10159144651280554

Comments

Popular posts from this blog

unfortunate incident at Harishchandragad 1st August 2023 report by harishchgandragad guide balu

Engineering student from Malegaon slips and dies at salhar fort at balgan 16th July 2022